Friday, February 22, 2013

छोटी छोटी बाते....

छोटी छोटी बाते....
परत स्फोट... बॉम्बशोध पथक.. बघ्यांची गर्दी, सर्कस बघायला आल्यासारखी... परत चर्चा...
जोरदार बंदोबस्त.. मग investigation...पोलीस राबणार.. समितीची नेमणूक.. त्यात वशिलेबाजी...
त्यावर चर्चा... माननीय नेते मंडळींची भाषणे...
बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते... 
लोकांची मते.. वाचकांचे पत्र व्यवहार... निषेध आरोप.. प्रत्यारोप...
जाहीर माफी... खलबते.. मुलाखती... आजचे सवाल... SMS...
८१% होय.. १५% नाही... ४% माहित नाही....
investigation सुरूच... जवाबदारी कोणीतरी घेई पर्यंत...
TV वर लोकांची रडारड... बड्या नेत्यांची विमानातून/हेलिकॉप्टरमधून/ऐसी गाडीतून भेट... त्यावर चर्चा... नकला..
प्रत्युत्तरे... पलटवार... स्फोटात सापडलेल्या लोकांचे संसार उभे करण्यासाठी प्रयत्न... सरकारी मदत घोषणा... आधार कार्ड.. बँक खाते... "आधार" अनिवार्य?
मिडियातर्फे निषेध... स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या भेटी...
सोन्याचे शर्ट घालून फोटो... मुलांचे दणक्यात लग्न... चुकीचे? बरोबर?..  
आजचा सवाल... संपादकीय लेख...
निषेध मोर्चे... मेणबत्त्या... श्रद्धांजली.... फेसबुक... ऐसीत बसून आरामदायी खुर्ची... कीबोर्ड बडवणे... 
मी काय करतोय????
मुसलमानच असणार हे... हैदराबाद ना, बहुसंख्य मुसलमान, हिंदुत्ववादी असतील... संघाची मदत... वृत्तपत्रात दखल/बे-दखल.. फोटो...
IM च्या पेज ला लाईक्स... RSS च्या पेजला पण लाईक्स...
नाक्यांवर चर्चा.. जेवताना चर्चा... गुलाबजाम, आईस्क्रीम खाताना चर्चा... फेसबुकवर video sharing... लेखच्या लेख... मी काय करतोय?
पोलिसांना शिव्या, नेत्यांना शिव्या... परप्रांतीय...
स्फोट करणारे घरी एसीत बसून TV वर सगळं बघून हसत आहेत...
नेत्यांची भडकाऊ भाषणे... बस पेटवा... भारत बंद... निषेध... 
नेत्यांना अटक... पोलिसांच्या गाडीतून जाताना त्यांचे लोकांना हात हलवून अभिवादन... हसत हसत.. घोषणा देत...
अजून एक गुन्हा दाखल... संध्याकाळी सुटका.. press conference...कदाचित जाहीर माफी... लोक खुश...
रास्ता रोको... हार-तुरे.. समारंभ...
क्रिकेट? खेळाडूंना आमंत्रणे... निषेध... तरीही खेळाचा सामना सुरक्षित...
खेळाडूंना राजकारणात अडकवणे... चुकीचे? बरोबर? दिग्गजांची मते... परत चर्चा...
शहरांत मुलींना तोंडावर रुमाल बांधायला बंदी... आमचा हक्क सोडणार नाही... रुमाल बांधणारच... सुरक्षा गेली तेल लावत..
मुसलमानांना बुरख्यावर बंदी? नाही... धार्मिक भावना दुखावायच्या??
फतवे... २ गट...
सापडला... सापडला....
शेख, अब्दुल, शकील... धागेदोरे..अटक.. जिहादी घोषणा... भारतातूनच अटकेचा निषेध, मोर्चे... We are all Abdul, hang us till death....
राष्ट्रीय स्मारक उध्वस्थ... गोळीबार... पेटवा गाड्या... अन्याय... अन्याय.. अल्पसंख्यांक... पोलिसांच्याच गाडीवर उभं राहून पाकिस्तानचा झेंडा...
बडे बडे शहरो मे छोटी छोटी बाते....
सापडले.... साध्वी प्रज्ञा... भगवा दहशतवाद... हिंदू अतिरेकी... मुसलमान गरीब बिच्चारे...
मोर्चे.. माफी... थंड!!!!
दिल्लीत बलात्कार... बोअरच्या भोकात प्रिन्स...
घोटाळे... काही हजार कोटींचे... चाऱ्यापासून विमानापर्यंत... स्वीस बँकेत खाते... काळा पैसा... उपोषण... मनधरणी... मोसंबी रस.. उपोषणावरून राजकारण.. आंदोलन... गांधी टोप्या... लोकांना टोप्या...
स्फोट विरला... आवाज विरला... लोक विसरले...
समझोता एक्सप्रेस सुरु... शस्त्रसंधी... काश्मीर... काश्मिरी पंडितांच्या हत्या सुरूच... अलीगढ university...मतांचे राजकारण...
सगळे थंड... सगळे आपापल्या कामांवर... नेत्यांसकट..
आणि मी तरी काय करतोय????
त्याच जाहीर सभा, तेच फलक... त्याच घोषणा.. तीच आश्वासने.. तेच आरोप-प्रत्यारोप...त्याच निवडणुका आणि तेच नेते...
तीच कामे.. पैसे.. लाच... तेच प्रश्न.. वाहतूक, पाणी, शेतकरी...
तेच सगळे...

बडे बडे शहरो मे तो छोटी छोटी बाते होती ही रहती है....

Thursday, February 7, 2013

किल्ले घनगड (Ghangad)

Fort name: Ghangad
Base villege: Ekole, Bhambarde
Type: Easy (As ladder is placed there now.)
How to go: From Pune to Lonawla. Take left towards Amby Vally. Continue straight till you find "Koraigad" at left. Continue with right side of road. At "Bhambarde Fata" take right. Continue straight. After 7-8 KM, there is "Saalghar" village. Don't go at right. Just after 1-2 KM, "Tail-Bail Fata" is there. Take left for Ghangad (right for Tail-Bail). Continue till you find ST bus stop & take right. Now the road take you to Bhambarde Village then Bhambarde Gavthaan & then Ekole.

Distance is about 105 KM from Pune.

Another route is by Pune-Chandani Chowk-Pirangut-Poud-Mulshi Dam_Bhambarde. Distance is about 90 KM.

Whats there at fort:
There are 2-3 tanks with drinking water & other 2-3 with drinking water if chlorinized.
Temple of Gaarjai Devi. 5-6 people can sleep inside & 5-6 outside.
Toilet is there at fort, but its not usable as its not clean.

                २५,२६,२७ जानेवारी जोडून सुटी असल्याने ट्रेकचे जोरदार planning चाललेले होते. त्यासाठी ब्लॉग वाच, साईट्स धुंडाळ, नकाशे बघ सगळे करून झाले आणि अखेर सगळेच फसल्याने गप् गुमान घरी गेलो. मात्र आई-बाबा आणि मित्र यांच्याबरोबर फिरण्याचा योग जुळून आला आणि "जयगडचे दीपगृह" बघण्याचे समाधान पदरात पाडून घेतले.
                परत आल्यावर मात्र परत planning चालू झाले. परत ब्लॉग, साईट्स, नकाशे........शनिवार-रविवार चा plan आम्हा सहा जणांची विविध ठिकाणी adjustment करून फिक्स झाला. आणि ४ जण त्यांच्या-त्यांच्या अपरिहार्य कारणाने गळाले. तोपर्यंत पराग ओकला मी जवळ-जवळ तयार केले होते. पण ३ जणांत २ दिवसांचा ट्रेक? अर्थातच तोही रद्द होण्याशिवाय पर्याय नव्हता. तहान ताकावर भागवायची म्हणून घनगड निवडला. १ डे साधा ट्रेक.
                पन्नास पाऊणशे फोन, कधी निघायचे, स्टे करायचा कि नाही, शनिवारी करायचा कि रविवारी वगैरे वर चर्चा झाल्यावर शनिवारीच संध्याकाळी जायचे ठरले. उशिरा निघायचे होते ५ नंतर वगैरे... आता तर चांगले ५ जण झाले होते. पराग, मी, आनंद, समीर आणि त्याच्या मित्र. दुपारी २-२:३० च्या दरम्याने समीर चा फोन आला कि त्याला जमणार नाहीये. पर्यायाने त्याच्या मित्राचे कॅन्सल होणे आलेच. आता ५ जण आहोत म्हणून स्टे करायचे ठरले होते पण २ कॅन्सल... ३ जणांत स्टे ट्रेक करायचा!!!(फुल्या फुल्या... सगळे Planning मधेच cancel झालेले ट्रेक सांगून पाडतोय  कि काय एक blog post ??) पण नाही पण आम्ही तिघांनी ताकावर का होईना तहान भागवायचेच ठरवले होते. दुपारी ३:३० ला ठरले कि तासाभरात चांदणी चौकात भेटायचे. मी आनंद आणि पराग.

घनगड

                 गुगल मॅपवर घनगडचा रस्ता चांदणी चौक-पिरंगुट-पौड-मुळशी धरण-भांबर्डे असा होता. परागने लोणावळ्यावरून जायचे ठरवले होते, पण गुगल करायला वेळ नव्हता. त्यामुळे लोणावळ्यानंतर शोधकार्यच होते. लोणावळ्यात पोचलो, एका उडप्याच्या गल्ल्यात पैसे जमा केले आणि त्याबदल्यात वडा-सांबर आणि चहा हादडून "भांबर्डे" शोधार्थ निघालो.
                एक मात्र आहे, Amby Vally च्या निमित्ताने का होईना रस्ते चकाचक आहेत. अंधार पडला नसला तरी उंबरठ्यापर्यंत आला होताच. २-२ जणांना विचारत, रस्त्याची खात्री करत गाड्या हाकत होतो. इथे येताना थांबू, इथला फोटो काढायचा येताना अशी "येतानाची पोतडी" भरत होतो. भांबर्डे हे गांव असल्याने ते लवकर झोपते. रस्त्याला माणूस नसले विचारायला आणि समोर २ रस्ते दिसले कि काय होते ते अनुभवण्याची इच्छा नसल्याने लवकरात लवकर पोहचायचे होते. भांबर्डे हे बऱ्यापैकी मोठे नांव होते. ज्याला विचारू त्याला ते ठाऊक होते.
                डावीकडे कोराईगड असावा असा अंदाज आला. फाट्याजवळ हॉटेलबाहेर पुनःश्च "भांबर्डे कुठे" विचारणा केली असे २-२ जणांनी ४ वेळा "पुढे चौकात उजवीकडे, डावीकडे नाही जायचे" बजावल्यावर गियर टाकणार इतक्यात "तुम्ही दोघंच का? पुढे जंगलातून जातो रस्ता, सुनसान असतो." असे "कसे काय जाणार बाबा हे शहरातले लोक रात्री त्या जंगलातून.." type चेहरा करून विचारले. "नाही नाही, अजून एक आहे न पुढे " असे दिलासा (स्वतःला कि त्यांना!) दर्शक "दो से भले तीन" च्या धर्तीवर (स्वतःशीही मान्य करून) सांगितले.
                मग "पुढचा चौक" शोध सुरु.. एक हॉटेल लागले आणि २ रस्ते. हॉटेल मधला अण्णा पंक्चर शोधण्यासाठी टायरटयूब पाण्यात टाकून बुडबुडे काढत बसला होता. "भांबर्डे?"... काही नाही. "भांबर्डे कुठे हो?" - मी. पाण्यातल्या टायरटयूब मधून बुडबुडा आला आणि नंतर कोणीतरी काहीतरी विचारत असल्याची जाणीव त्याला झाली. टयूबवरच्या बुडबुड्याच्या उगमस्थानाशी खूण करत ती परत पाण्यात बुडवली आणि "भांबर्डे? उजवीकडे." ट्युबवर अजून दुसरे भोक न सापडल्याने त्याने माझ्याकडे वळून explain केले. "सरळ जा, पुढच्या चौकात उजवीकडे वळा, भांबर्डेच्या चढात जायचे ना?" आता "भांबर्डेचा चढ" काय भानगड माहित नसली तरी हो म्हटले. त्याच्या सहकाऱ्याने "सामने जाके, चौक मे, राईट लेनेका हां" बजावले. पुढे एक तिठा आला आणि उजवीकडे कडेला पाटी दिसली "भांबर्डे". अंतर वाचण्याच्या प्रयत्नात divider जवळ रेव्यावर गाडी गेली. मुकाट्याने गाडी थांबवून वळवली आणि बोर्ड वाचला. हाच तिठा तो "उजवीकडे वळण्यासाठीचा पुढचा चौक" होता. Amby Vally चा रस्ता सोडला आणि खराब रस्ता लागला. आता तो ११ किमी जंगलातून जात होता. खरोखरच एकही माणूस, गाडी नव्हती आसपास. दोन्ही गाड्यांमध्ये जास्त अंतर न राखता जात होतो. गावात ST जात असल्याने रस्ता अगदीच वाईट नव्हता. जरा वेळाने आवाज ऐकू येऊ लागला. कोणी माणूस नाही आणि गाणी? डाव्या बाजूने एक गावकरी डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन चालली होती. तिच्याकडे batttery नव्हती किंवा तिला गरज वाटत नसावी, पण मोबाईलवर गाणी ऐकत चालली होती. पुढे एका माणसाने "उजव्या बाजूच्या रस्त्याने जा" असे सांगितले. थोड्याच अंतरावर "सालतर" नावाचे गांव लागले. परत २ रस्ते. उजवीकडचा पकडला. लगेचच ST ची शेड आणि २-३ घरं होती. एका मंदिरात ७-८ मुलं बसली होती. १-१ करत प्रत्येकाने "काय रे? कोण? काय पायजे?" विचारून घेतले आणि "पुढे जाऊन उजवीकडे वळा" असे सांगितले. म्हणजे आत्ता आम्ही वळलेले वळण हे "ते" उजवीकडचे वळण नव्हते. मग U-turn मारून सरळ निघालो. परत २ रस्ते आणि पाटी "तैल-बैल फाटा". पण त्या पाटीवर "तैल-बैल कुठे" ते लिहिलेच नव्हते... "उजवीकडे वळा" ची सूचना असल्याने तिकडे वळणार होतो पण अचानक आठवण झाली. पराग चा मित्र घनगड ला आधी जाऊन आला होता. सगळ्यांनी फोन काढले. डोकोमो कडून रेंज ची अशा व्यर्थ होती. Idea ने फक्त त्याचा काही उपयोग नसल्याची idea दिली. "BSNL है मेरे लिये" ने साथ दिली. पण परागच्या मित्राला अशी पाटीच आठवत नव्हती. तोपर्यंत एक प्रकाश दिसला आणि गाणी ऐकू येऊ लागली. ह्यावेळी गाडीवरचा माणूस स्वतःच मोठ्ठ्या आवाजात गाणी म्हणत होता. तो "तैल-बैल" चा रहिवासी होता. उजवीकडे जाणारा रस्ता तिकडे जात होता. नशीब गेलो नाही आधी, कारण हे ही वळण "ते" उजवीकडे वळायचे नव्हते. त्याने "घनगड ला नंतर जा, आधी आमच्याकडे तैल-बैल ला चला की" असे आमंत्रण दिले. "उद्या येऊ जमलं तर" असे सांगितले तर "घोडके (की तत्सम काहीतरी) गुरुजी विचारा कोनालापण आणि या आमच्याकडे" बोलून निघून गेला.
                गाड्यांची तोंडं फिरवून डावीकडच्या रस्त्याने "भांबर्डे" गावात जाणारा "तो" उजवीकडचा फाटा शोधत निघालो. एखाद्-दोन किमीवर ST ची शेड आणि "तो" उजवीकडे जाणारा फाटा लागला. तिथे उभ्या असलेल्या लोकांना विचारून त्याची खात्री केली. अखेर भांबर्डे गांव लागले. पुढे २ किमीवर एकोले गांव आहे असे कळले. रस्ता पण बरा होता. वस्ती दिसली, मंदिरही दिसले. गाड्या उभ्या केल्या आणि गडाकडे जाणारा रस्ता कुठे ते तरी बघून ठेऊ याची चौकशी करण्याच्या इराद्याने मनुष्य शोधू लागलो. शेजारच्या घरातल्या खिडकीजवळ यजमान आणि त्याची पत्नी फोनवर त्यांच्या शिकायला दुसरीकडे असलेल्या मुलीशी बोलत होते. आपल्यालाच काही वाट दिसते का ते बघत होतो. मुळात गडच दिसत नव्हता तर वाट काय दिसणार... मग त्या माणसाचे बोलणे पुरे व्ह्यायची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. एक तर गेले २ दिवस गावात रेंज नसल्याने त्यांचा मुलीशी  संपर्क झाला नव्हता असे त्याच्या बोलण्यावरून समजले. त्याचे बोलणे उरकल्यावर एकोले गांव पुढे असून हे भांबर्डे गांवठाण आहे हे ज्ञान मिळाले.
                गावातली 'संध्याकाळ' उलटून गेली होती हे त्याच्या मुखातून येणाऱ्या तांबूस वासाने जाणवून दिले. गडावर १५ मिनिटांत जाल असेही त्याने सांगितले. आता 'त्या' अवस्थेत १५ मिनिटांत घनगड काय, तैल-बैल वर सुद्धा १५ मिनिटांत without rope जाऊन येता येते असे म्हणाला असता.
Making tea on portable stove

                पाचच मिनिटांत एकोले गांव आले. चौकशीला थांबल्यावर २-३ जण पुढे आले. बहुतेकांची संध्याकाळ उलटून गेलीच होती. एक जण वाट दाखवायला पुढे आला. आत्ता खरा गड दिसला. तेवढ्यात एका माणसाने "'मारुती कदम' विचारत कसे नाही आलात तुम्ही?" असे विचारले आणि स्वतःची ओळख "मी मारुती कदम" अशी करून दिली. आम्ही 'मारुती कदम' अशी चौकशीही केली नाही आणि आम्हाला दुसराच कोणीतरी माणूस वाट दाखवतोय याचे त्याला प्रचंड आश्चर्य वाटले.  मग त्याने परत आम्हाला वाट दाखवली. गडाच्या अर्ध्यात '' देवीचे देऊळ आहे. १५ मिनिटांत गडाचा माथा काय, अर्ध्या तासात ते देऊळ जरी आले तरी तिथे राहू असा विचार करून head-torch काढला. २ torch च्या प्रकाशात वाट न सोडता बरोबर १५-२० मिनिटांत मंदिराजवळ पोचलो. "वरचा दिवा बघतच जा, माळावर उजवीकडे वळण लागेल, तिकडे जाऊ नका" हे लक्षात ठेवत देऊळ बरोबर सापडले होते. देऊळ उत्तम होते. सामान ठेवले. आता आमच्यासमोर आकर्षण होते ते परागच्या "portable stove" चे! चहाचे समान, पराठे वगैरे बाहेर काढले. maggie चा प्रोग्राम आधीच कॅन्सल केल्याने हेच आमचे जेवण होते. परागने काढलेल्या सामानात स्टोव्ह कुठे दिसेना. पण एका dissection box एवढ्या खोक्यातून कंपासपेटी बाहेर काढली आणि ती उघडून स्टोव्ह म्हणून मांडली. त्यात डांबरगोळी सारखी वडी ठेऊन त्याच्या ज्योतीवर चहा केला. पराठा, चिवडा आणि पोळ्या ह्यांचा त्या चहाबरोबर फडशा उडवला.
                डोक्यावर torch असल्याने गडावर जाणारी वाट कशी आहे ती बघावी म्हणून बाहेर पडलो. थोडे वर गेल्यावर एक "आधुनिक स्वच्छकुपी" दिसली, आणि जरा वर मागच्या बाजूला एक गुहाही सापडली. परागच्या SLR मधून फोटो काढून घेतल्यावर शिडी शोधू लागलो. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर २ गुहा सापडल्या, त्यात पाण्याचे पाईप, बादल्या वगैरे साहित्य दिसले. शिडी चढून बघितली आणि उरलेला गड सकाळसाठी surprise म्हणून ठेवला आणि देवळात परत आलो. फोटो काढण्यासाठी ठिकाणं मात्र हेरून ठेवली होती.
Ladder

                परागच्या android कृपेने पंचांगात रविवारच्या सूर्योदयाची वेळ पाहून नवीनच घेतलेल्या sleeping bag चे उद्घाटन केले. देवळात झोपल्याने थंडी वगैरे लागलीच नाही. ६ ला उठून, तोंडं घुसळून झाल्यावर गोळी पेटवून चहा केला. राखीव चिवडा आणि पराठे संपवले. सगळं सामान देवीच्या हवाली करून वरती धाव घेतली. परागला त्याच्या SLR चा वापर करायची संधी खूप वेळा दिली. पूर्वेकडच्या मोठ्या डोंगरामुळे सूर्यप्रकाश अडत होता. पश्चिमेकडे तैल-बैल घोडके(?) गुरुजींची आठवण करून देत होते. बालेकिल्ल्यावर ध्वज फडकत होता. पिण्यायोग्य पाण्याची २-३ आणि इतर ३-४ टाकी, मोठी चीप आणि त्याखालची "" देवी आणि संपूर्ण गड पाहून ९:४५ ला गावात परत आलो. ताडासह इतर भरपूर झाडे, गाई-गुरे, गावकरी यांना राम-राम करून परतीच्या प्रवासाला लागलो.
                रात्रीच्या वेळी सुनसान, भयाण वाटणारा तो रस्ता आता मात्र सुंदर भासत होता.