Friday, December 24, 2010

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांचे हार्दिक अभिनंदन...

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांचे हार्दिक अभिनंदन...


जातीयवादी लोकांमुळे लालमहालातील दादोजींचा पुतळा हटवण्याचा (हलवण्याचा नव्हे!) निर्णय बहुमताने संमत करण्यात आला (कदाचित "झाला" असेल संमत "केला" नसेल.).

अर्थात बिनग्रेडी लोकांचा उत्साह, तीव्र इच्छा, पराकोटीचा ब्राह्मण-द्वेष (तो इतरांच्यात भीनवण्याची कला) आणि त्यानुसार चाललेले सर्व थरातून प्रयत्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व इतिहासकार, संशोधक आणि आपण बामन लोक यांची इतिहासाबद्दलची अनास्था यामुळे त्यांना यश येणारच होते.

माफ करा.. आम्हा बामन लोकांना इतिहासाबद्दल अनास्था नाही तर आम्ही समाजाचा विचार करतो... समाजाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी साध्य होणार असतील तरच आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देतो...

त्यामुळे आम्हाला असे दादोजी किंवा इतर कुठल्याच वादात पडायचे नाही... पुतळा फुटला तर फुटला, उद्या शनिवार वाडा पाडला तर पाडला, आमचं काय जातंय...

आमचं मत एकच, पुतळा गेला तरी इतिहास बदलत नाही (मग भले तो कोणाला समजला नाही तरी, पुसला गेला तरी, पुढच्या पिढी पर्यंत पोचला नाही तरी!) आम्ही त्यांना अनुल्लेखाने मारू (हे कसे करणार, त्याचा उपयोग काय हे देव जाणे.)

आम्ही सध्या फक्त समाजाचा (म्हणजे खरा तर आमचा, स्वतःचाच फक्त... म्हणायचं समाज वगैरे!!!) विचार करतो. ज्या गोष्टीमुळे आमच्या जीवनावर, दैनंदिन गोष्टींवर फरक पडत नाही त्याचा विचार आम्ही करत नाही.

त्यामुळे राव साहेबांच्या भाषेत सांगायचे तर "इतिहास सुद्धा गेला उंउंउंउंउं"!!!

पुतळा लाल महालातून हलवल्यामुळे कांद्याचे भाव तर कमी होणार नव्हते, पुण्यातले रस्ते, वाहतूक व्यवस्था तर सुधारणार नव्हती... दहशतवाद अजिबात कमी होणार नव्हता... पुण्यातील जागांचे/घरांचे दर तर उतरणार नव्हते ना...

असे खूप प्रश्न सुटणार नव्हते...

अभिनंदन!!! आता मात्र तसं होणार नाही... दादोजींचा पुतळा हटवल्याने सगळ्या नाही तरी खूप गोष्टी सुरळीत होतील...

कांदा स्वस्त होतोय तो त्याच्यामुळेच... (निर्यात कमी केली वगैरे सगळ्या थापा आहेत अरे...)

भ्रष्टाचार वगैरे जाण्यासाठी मात्र एवढे पुरणार नाही...

शनिवार वाडा पडलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही...

आणि दहशतवाद वगैरे पासून मुक्तता पाहिजे असेल तर सज्जन गडावरून रामदास स्वामींची हकालपट्टी!!!!

मग सग्गळं नीट, सुरळीत होईल...

असो, लाल-महालातून पुतळा हटवण्यामागची भूमिका मांडताना महत्वाचा मुद्दा असा होता कि दादोजी-शिवाजी हे गुरु-शिष्य नाहीत हे सरकारने मान्य केलेले आहे तरी तो अनऐतिहासिक पुतळा हटवावा, नाहीतर फोडण्यात येईल...

आमच्या इतिहास तज्ञांनी तो पुतळा गुरु-शिष्य नात्याशी संबंधित नसून "सोन्याचा (फाळ लावलेला) नांगर फिरवण्याच्या" घटनेचे प्रतिक आहे, त्यामुळे जरी गुरु-शिष्य मुद्दा विचारात घेतला नाही तरी तो पुतळा आहे तसाच असणे गरजेचे आहे... त्या घटनेच्या वेळी शहाजी राजे पुण्यात नव्हते तर सगळा कारभार शिवाजी महाराज, जिजाबाई यांच्यासह जेष्ठ म्हणून दादोजींच्या हाती सोपवून बेंगळूरला होते... त्यामुळे त्या पुतळ्यात शहाजी महाराज नाहीत आणले तर तो पुतळा अनऐतिहासिक होईल...

हा मुद्दाच मांडला नाही... जर मांडला असेल तर तो विचारात घ्यावा असा मांडला नाही...

आणि आम्ही बामन लोक काही न करता, आपापली कामे करत राहिलो... बिनग्रेडी लोकांचे आंदोलन वगैरे काही गोष्टींमुळे रस्त्यावर गाड्यांना, लोकांना होणारा त्रास सोसत मनातल्या मनात ४ शिव्या घातल्या एवढंच....

मी फक्त ब्राह्मण लोकांबद्दल बोलतोय कारण, मला आमच्या लोकांची मतं माहित आहेत... ब्राह्मणेतर लोकांची मते फारशी माहित नाहीत. खूप लोक दादोजीच्या बाजूने आहेत हे खरं आहे.

साहित्य संमेलनाच्या आधी त्याला विरोध करताना शिवाजी जनार्दन शिवाजी चव्हाण यांचे वक्तव्य:

"ज्या दादू कोंडदेवचा शिवरायांच्या बालपणाशी सुतराम संबंध नाही, ज्याला स्वराज्य काय हे माहिती नाही ज्याचा उजवा हात छाटण्यात आलेला आहे. ज्याच्या बद्दल अनेक संशय व्यक्त केले जातात. ज्या माणसाने विश्वासघाताने अनेक मराठा मराठा बहुजन सरदारांना मारले. अशा माणसाचे नाव आम्ही कदापि खपवून घेणार नाही. काही इतिहास करांनी त्यांना शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरु, पालक, मालक, मार्गदर्शक पदी नेमले खोटा इतिहास आमच्या माथ्यावर मारला तेव्हा अशा माणसाचे नाव आम्ही स्टेडीयमाला राहू देणार नाही ते बदलूनच श्वास घेणार!"

असे म्हणताना, दादोजींचा संबंध तोडून टाकला शिवाजींच्या बालपणाशी आणि स्वराज्याशीही...

असो, लवकरच दादोजींची इतिहासातून हकालपट्टी होईल, त्यानंतर गागाभट्ट, समर्थ रामदास स्वामी, पेशवे याचा नंबर आहे...

असे खूप जण नंबरात उभे आहेत...

सर्व निष्क्रिय इतिहासकार, तज्ञ, संशोधक आणि आपण सगळे निरुत्साही बामन यांच्या कृपेने त्यांच्या कार्य सिद्धीस जाईलच हा विश्वास आहे... तरी त्यांना शुभेच्छा देतो!!!