Monday, July 29, 2013

कहाणी Table Mountainची


                Table Mountain केलेच शेवटी. खरं तर Table Mountain हे काही त्यावर लिहिण्याएवढे मोठे नाही, पण आपोआप झाले ते.
                इथे केपटाऊनमधे कार नाही म्हणजे कठीण होते. Combi हा पर्याय असतो तसा. पण बदनाम आहे Combi. Security च्या नावाने बोंब. तसा Sea point हा भाग secure मानला जात असल्याने Camps Bay ला Combi ने गेलो होतो मी. पण Table Mountain ला Combi पण जात नाही. Bus च्या नावाने तर शंखच आहे. एकाला पटवून मला Table Mountain ला सोडायला लावले. ५० विनवण्या, त्यांच्या त्यांच्या सोयी नंतर का होईना, इष्ट स्थळी पोचलो. त्याला काम असल्याने, मला न्यायला यायला जमणार नव्हते त्याला. पुढचे पुढे म्हणून तिकिटाच्या रांगेत उभा. २ रांगा दिसल्या. एक खूप मोठी होती. "Online" ticket काढताना "Buy online & avoid line at ticket office" असे वाचले होते. तिथल्या official ने छोट्या लायनीत उभे केले. मी खुश. बिच्चारे Offline वाले असा भाव तोंडावर घेऊन counter ला गेलो, ऐटीत तिकीट नंबर सांगितला. online च्या घुश्श्यात, mobile वर PDF open करून. लोकांना शून्याला "ओ" म्हणायची का सवय आहे मंडेला जाणोत. त्यातून 405785097 ह्या नंबर मधे न समजण्यासारखे काय आहे? पण मला ५ वेळा सांगावा लागला नंबर. फोर, झिरो.. म्हटल्यावर ४ वेळा शून्य लिहिले तिने. मग फोर, ओ, फाईव्ह..
                अखेरीस तो नंबर तिच्या पचनी पडला आणि Nolubabalo अश्या अत्यंत गोड नामधारी मुलीने तिकीट मला सुपूर्द केले. आता डोंगरावर मी काचेच्या पेटीतून जाणार होतो. त्याच्या तिकिटावर "Always remain on footpath' असे लिहिले होते. मुळातला रस्ताच नव्हता, तर footpath कुठला!! ज्या रांगेकडे पाहून मी हसलो होतो, त्याच मोठ्या रांगेत मला ते तिकीट घेऊन उभे राहावे लागले. तीच रांग Cable Car कडे जाणाऱ्यांची होती. शेवटचा member म्हणून त्यात मी दाखल झालो. सरकत सरकत एका पेटी जवळ पोचलो. त्याला cable वगैरे काही दिसेनाच! आता cable शिवाय, cable car आम्हाला कशी नेणार ह्या चिंतेत असतानाच, ती जुनी car फक्त शो साठी ठेवल्याचे दिसले. तिथेच हिरव्या फडक्या समोर प्रत्येक ग्रुप चे फोटो काढत असलेले दिसले. हा प्रकार लगेच लक्षात आला. त्या फडक्या समोरचा फोटो कशाततरी घुसडणार आणि आपल्याला तोच फोटो विकायला ठेवणार. घेतला तर घेतला. गाजराच्या पुंगीसारखा प्रकार होता तो. Digital photo फुकट असतात म्हणून हो. roll चा जमाना असता तर असे फोटो त्यांनी फुकट घालवले असते काय.. पैसा आला की कोंकणस्थीपणा आलाच. परदेशी काय आणि आणखी कुणी काय. नांवं फक्त "कोब्रा"ना!! असो... माझ्या बाबतीत ही पुंगी त्यांना मोडून खावी लागणार होती. एक तर हिरवा फडका... हिरवा!! मी एरवी फोटोच काढू दिला नसता, पण एका गौरवर्णीय मुलीने please sir, thank you. वगैरे म्हटल्यावर म्हटलं बाई, काढ पाहिजे तेवढे फोटो.
                काचेच्या पेटीकरता lift ने वरती जावे लागणार होते. आमच्या लिफ्ट मधे पहिला शिरणारा इसम मीच. मी बापडा गुपचूप जाऊन कोपऱ्यात उभा राहिलो. सगळे माझ्या मागोमाग. दरवाजा लागला, automatic! (हल्ली मला automatic हा शब्द एकाच पद्धतीने उच्चारता येतो, ज्याने "मी आणि माझा शत्रुपक्ष" ऐकले असेल, त्याने त्याच सुरात वाचला असेल.) लिफ्ट भलतीच smooth हो. धक्का नाही, काही नाही. मिनिटाभराने सगळ्यांच्या लक्षात आले की लिफ्ट तिथेच आहे, हललीच नाहीये. वर जायचे बटणच दाबले नसल्याने आम्ही तिथेच होतो. लिफ्ट मधे पहिला शिरणारा इसम मी. अर्थात मी बटण दाबले असेन असे गृहीत धरून कोणीच त्याकडे लक्ष दिले नव्हते. दरवाज्याप्रमाणे सगळेच Automatic असेल म्हणून मी उगाच बटण दाबले नव्हते. कोणीतरी ते सत्कार्य केले आणि आम्ही ५ व्या मजल्यावर पोचलो.
        नंबर आल्यावर काचेच्या पेटीत घुसलो. कडेच्या काचेजवळची जागा बाकीच्यांनी पटकावल्याने मी आपला मध्यभागी instructor उभा असतो त्याच्या बाजूला उभा राहिलो. तिथे गोलाकार बाकडे दिसले. बरंय म्हणून वाईच टेकलो. पेटीची दारं बंद होऊन पेटी सरकू लागली तर तो गोलाकार भाग, बाकडे आणि त्यावरच्या माझ्यासकट फिरू लागला. वेंधळेपणामुळे असले फजितीचे प्रसंग मला नवीन नव्हते त्यामुळे प्रसंगावधानाने पटकन camera काढत उभा राहिलो आणि excuse me म्हणत त्या गोल चबुतर्‍यावरून कडेला गेलो. camera उंचावून थोडे फोटो टिपले. निसर्गाचे. त्या कौतुकाच्या cable car ने ४ मिनिटांत आम्हाला वर नेऊन सोडले. मग मी रोज दुपारी जेवायला तिथेच जात असल्याच्या थाटात फिरायला लागलो.
                धपाधप फोटो ओढत होतो मी. तेवढ्यात २ दुर्बिणी दिसल्या आणि त्यातून २ तरुणी निसर्ग न्याहाळताना दिसल्या. मी पण आपली apartment दिसत्ये का ते पाहू म्हणून नंबर लावला, तिथे चक्क रांग किंवा गर्दी पण नव्हती. आश्चर्य वाटले. तरुणींनंतर त्या दुर्बिणीला डोळे आणि नाक लावले तर निसर्ग वगैर काही नाही, माझ्याच डोळ्यांची बुब्बुळे दिसत होती, नाकाजवळ आलेली. झोल काय म्हणून बघितलं तर खाली पैसे टाकायला जागा आणि R1.5 लिहिलेले. लगेच गर्दी नसल्याचा उलगडा झाला. एवढ्या वर येऊन दुर्बिणीतून काय बघायचे, स्वतःच्या डोळ्यांनी निसर्ग न्याहाळ्यावा, म्हणून बाजूला झालो.
                आता माझा फोटो घ्यायला कोणीच नव्हते माझ्याबरोबर. timer लाऊन एखादा फोटो नेहमीच घेतो हो आम्ही trek ला गेल्यावर, पण इथे ते शक्य नव्हते. शेवटी जी जागा आपल्याला आवडेल ती जागा पकडायची आणि बकरा शोधायचा. असे १-२ जण सापडतातच की.. मुलगा त्याच्या GF/बायकोचा फोटो काढत असतो आणि ती त्याचा, पण त्या दोघांचा एकत्र फोटो काढणारे कोणीतरी त्यांनाही पाहिजे असते. समाजसेवेच्या भावनेने मी स्वतःहून त्यांचा फोटो काढायला पुढे व्ह्यायचो. मग त्यांनी "Do you want your photo with Lion's head/camps bay?" असले काहीतरी विचारले की त्यांचं मन मोडणं बरोबर दिसत नाही म्हणून माझा Camera त्यांना देऊन २-३ फोटो काढून घ्यायचो. मग पुढची जागा, पुढचा बकरा!
                असे ८-९ बकरे धरून फोटो काढून घेतले. एक जर्मन जोडपे सापडले. फोटो झाल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून ते confuse आहेत असे दिसले. लगेच माझ्या ४ पिढ्या capetown मधल्या असल्याच्या थाटात, Sea Point, Lion's head, camps bay, robin island वगैरे दाखवले. मी कुठे राहतो विचारल्यावर Sea Point असे वजनदार उत्तर दिले. पुण्यात कुठे राहतोस याला "सदाशिव पेठ" हे जसे वजनदार आहे तसेच sea point हे इथे आहे. त्यांनी Are you afrikan? म्हटल्यावर मात्र Do I look like Afrikan? असे आवाज जऽऽरा चढवून विचारले. आता मी "केळकर" दिसत नाही हे मान्य. पण म्हणून Afrikan? ऐकून नाय घेणार!! त्यांचे sorry घेऊनच पुढे गेलो. आता २ "बकऱ्या" होत्या. त्यांनी मात्र मी भारतीय असल्याचे लगेच ओळखले आणि पुढच्याच महिन्यात तिकडे येणार असल्याचे सांगितले. मी लगेच ताजमहाल सोडूनही बरेच काही बघण्यासारखे आहे हे सांगितले. जसा वर आलो होतो तसाच काचेच्या पेटीतून खाली परत आलो.
                आता खरा प्रश्न होता तो परतीचा. Table Mountainच्याच एका कर्मचाऱ्याला पकडून त्याला यक्षप्रश्न टाकला. त्या महिलेने चक्क मला स्वतः Combi मिळवून दिली. मी शिरल्यावर combi च्या डायवरने अजून ८-१० प्यासेंजर मिळवलेन. त्यांत २ जर्मन, ४ कोरिअन आणि २ ब्राझील च्या तरुणी होत्या. २ पुरुष कुठले होते त्याकडे मी लक्ष नाही दिले. क्लीनर मस्त होता. गप्पा चालू झाल्या, त्याने एका माणसाचे नांव घेऊन मला तो माहित आहे का ते विचारले, मी बेधडकपणे हो म्हटले. त्याच्या बोलण्यावरून तो फुटबॉल खेळाडू असावा असे मी ताडले. तो किती मस्त खेळतो, पहिल्यापासूनच.. वगैरे चढवल्या. आता १२वीत Radius, Ulna हे पायाचे हाड समजून ५ पैकी ३ मार्क मिळवलेत, तर खेळाडू क्या चीज है... Arsenal आणि Manchester United या फक्त नावांच्या भांडवलावर चढवत होतो. पण किती चढवणार? तरी काही कुट प्रश्न मी परतवले. गप्पा मात्र जोरात चालू झाल्या. कोरिअन आणि जर्मन लोक बोलायला गोड हो एकदम पण!! ;)
                कोरिअन पैकी एकीने माझ्या कपाळावरचा तिळा बघून ते काय ते विचारले. इकडे मला हा प्रश्न नवा नव्हताच. देवाची प्रार्थना करताना तो लावतो वगैरे सांगून I'm not married! ही माहितीही दिली. गैरसमज नको म्हणून बाकी काही नाही. NedBank मधे तिळा बघून Have you got married today morning? असे मला तिथल्या बाईने विचारले होते. फक्त लग्नात भारतीय पुरुष असे काहीतरी लावतात अशी तिची कल्पना. अजून एका दुकानात तर माझ्या कपाळाकडे बोट दाखवून "हे" कुठे मिळते असेही एका बाईने विचारले होते.
                City, Green point, waterfront करत करत सगळे उतरले आणि मी, डायवर अन् तो क्लीनर एवढेच शिल्लक राहिलो. क्लीनरने अजून कोणाश्याश्या माणसाचे नांव विचारले. उगाच रिक्स नको म्हणून मी माहित नाही असे सरळ उत्तर दिले तर तो चवताळलाच! Dont you know Sachin Tendulkar? He is GOD of cricket. I love him. म्हणून तो काळ्याचा लाल होऊ लागला. मी चटकन माफी मागितली. मी आधी वेगळेच काहीतरी ऐकले होते, मी काय करणार. मग दोघांनी सचिनची स्तुती केल्यावर तो मुंबई कडे वळला. bollywood, सलमान, शाहरुख वगैरे चालू झाले त्याचे. आता तो ग्रेट शाहरुख म्हणाला असता तरी मी लयच ग्रेट पण म्हणायला कमी केले नसते. एकटाच होतो न Combiत. गप् गुमान त्याच्या हा मधे हा मिळवले आणि Sea Point ला उतरलो. पुढच्या weekend ला नक्की भेटू म्हणून निरोप घेतला.
                इति Capetownपुराणे आफ्रिकाखंडे Table Mountain कहाणी सुफळ संपूर्ण.