Saturday, February 26, 2011

स्वातंत्र्यवीर!!! - I

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी ज्या माणसासाठी, International Court मध्ये सगळ्यांसमोर उभं राहून माफी मागितली त्या माणसाचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जवळच्या एका "भगूर" नावाच्या खेड्यातला.

वय १०: स्वदेशीचा फटका (आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा||) व सवाईमाधवरावाचा रंग (धन्य कुलामिध धनी सवाई भाग्य धन्यची रायाचे ।।) या कवितेची रचना...

वय १४: अष्टभुजा देवीसमोर प्रतिज्ञा...
आई, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन.
(यातलं "सशस्त्र क्रांती" आणि "मारता मारता मरेतो झुंजेन" हे फार महत्वाचे आहे...  क्रांती नुसती भाषणे देऊन नाही, सरकारला विनंत्या करून नाही, तर स-शस्त्र  आहे...
"देशासाठी मरेन" हे पण बरोबर, पण नुसतं मरेन का? नाही! "मारता मारता मरेतो झुंजेन"!!!)

वय १६: "स्वतंत्र्यते भगवती" कवितेची रचना...

FC कॉलेज मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर आरतीची रचना... "जय देव, जय देव, जय जय शिवराया..."

वय २१: सार्वजनिक सभेत व्याख्यान (सावरकरांचे बहुतेक पुण्यातील एकमेव व्याख्यान) त्यावर त्यावेळचे पोलीस reporter म्हणतात "‘’It was so dexterous ! So triumphant ! He is at The most 22, but he is already an accomplished orator of an enviable rank."

नंतर भारत, इंग्लंड, अंदमान, तुरुंगात कवितांची रचना...

नाट्यगीतं, नाटकं यांची रचना...

मराठी भाषेला अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना पर्यायी शब्दांची देणगी...
(Mayer: महापौर, Film/Picture: चित्रपट, Director/Direction: दिग्दर्शक/दिग्दर्शन ई.)

पुण्यात विदेशी कपड्यांची होळी...

किती यादी मांडणार...

लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून हा मनुष्य इंग्लंडला बॅरीष्टर पदवी प्राप्त करायला गेला. लो. टिळकांनी नुसते सांगितले नाही, तर त्यासाठी जे २ साक्षीदार लागतात त्यातील एक म्हणून सही सुद्धा केली. दुसरे साक्षीदार बनले "कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर"!
हे पोरगं इंग्लंडला गेल्यावर काय उपद्व्याप करणारे ते माहित असताना सुद्धा लो. टिळक जमीन राहिले. हा मोठेपणा!

वय २३: घरी बायको, ६ महिन्याचा मुलगा, तरीही हे चालले इंग्लंडला... "अरे, गुरु गोंविंदसिंगांनी नाही का त्याग केला, तसा आपल्यालाही करायला हवा" अशी हरनान सिंग नावाच्या मित्राची समजूत काढत...
काऽऽय माणूस असेल.. सोपं नाहीये हे.

बरं तिकडे जाऊन लगेच उपद्व्याप सुरु...
"India House" चालणार नाही... "भारत भवन"! ("पांडुरंग" चे "पांडूकलर" करतो का आपण?)
अभ्यास करत असतानाच तिथेच प्रयोगशाळा उभारली. सेनापती बापट बरोबरच होते.
एका रशियन माणसाच्या मदतीने बाँब तयार केले. एकाची Trial घेतली, जवळच्या जंगलात. लगेच त्याचे तुकडे जमा करून विल्हेवाट लावली.
दुसरे बाँब भारतात पाठवले, चतुर्भुज नावाच्या कूक बरोबर, स्वयंपाकाचे सामान म्हणून...
ते बाँब नाशिक मध्ये आले आणि गुजरात मधून बंगाल पर्यंत पोचले.
१९०८ साली खुदीराम बोस यांनी त्यातल्याच बाँबचा स्फोट केला.
इंग्लंड मध्ये एक पंजाबी हि-याचे व्यापारी, सरदारसिंग राणा यांच्या पैशाच्या मदतीने पिस्तुले खरेदी करून ती पुस्तकांत लपवून भारतात पाठवून दिली, या कानाचा त्या कानाला पत्ता, न लागता!
अनंत कान्हेरे यांनी त्यातील पिस्तुल वापरल्यावर सरकारला त्याचा पत्ता लागला आणि पिस्तुल पाठवणा-यावर अटक वॉरंट काढलं...

तिकडे इंग्लंडमध्ये समुद्र किना-यावर बसलेले असताना एक काव्य स्फुरलं. आपलं भाग्य चांगलं कि त्यांच्या मित्राने काव्याचे ते शब्द सगळे कागदावर उतरवून घेतले. काव्याचे शब्द होते... "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..."
ती कविता, मातृभूमीचे विरहगीत येथे अर्थासहित वाचू शकता.
http://www.savarkar.org/mr/साहित्य/‘ने-मजसी-ने’-–-एक-भावदर्शन
(शेवटची एक ओळ राहिल्ये तिथे, "जो आचमनी, एक क्षणी, तुज प्याला")

अटक वॉरंट निघाल्यावर त्यांना भारतात खटला चालवायला आणायचं ठरलं.

भारतातच का? तर भारतात कोर्टातली जबानी दाबायला सोपी जाते. जशी नथुरामच्या जबानीवर ३० वर्षांची बंदी घातली होती, जाहीर करायला...
इंग्लंड मध्ये तशी दाबा-दाबी करता येणं काठीण होतं.
विषय बदलायचा नाही... असो,

हिंदुस्तानातील कोर्टासमोर जाणे म्हणजे फाशी वा अंदमानला जाणे होय हे निश्चित होते. म्हणून आपले त्यांनी आपल्या वहिनीस आपले मृत्युपत्र लिहून धाडले. (हे मृत्युपात्रही २५ कडव्यांचे आहे.)
भारतात आणलं जात असताना मार्सेलिस या फ्रांसच्या बंदराजवळ आल्यावर त्यांनी रक्ताळलेल्या अंगाने, बोटीवरच्या संडासातून, जिथे भयानक मासे असतात,अश्या खा-या पाण्यात उडी मारली. फर्लांगभर अंतर पोहून किना-यावर पोचले पण इंग्रजांनी त्यांना परत पकडले.
Plan ठरलेला होता, यांनी उडी मारायची आणि किना-यावर मादाम कामा, ज्या फ्रांसच्या पार्लमेंट मध्ये सदस्य होत्या, यांनी त्यांना घेऊन जायचे. पण काही मिनिटांचा उशीर झाला आणि plan फसला. तो उशीर कदाचित भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीही उशीर ठरला, असे असू शकते.
पण दुर्दैवाने plan फसला आणि भारतात आल्यावर कोर्टाने ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली.
आजपर्यंतच्या जगाच्या, फक्त भारताच्या नव्हे, इतिहासात कोणालाही इतकी मोठी जन्मठेपेची/सक्तमजुरीची शिक्षा जाहीर सुद्धा झालेली नव्हती.

No comments:

Post a Comment