Thursday, February 10, 2011

बिनग्रेड - २

बिनग्रेड - २ == बिनग्रेड - हरी नरके - एम. डी. रामटेके.
(थोडक्यात, बिनग्रेड समर्थक नरके, रामटेके आता विरोधक!)

४ फेब्रुवारी २०११ च्या लोकप्रभा मध्ये एक लेख आला... प्रा. हरी नरके यांचा, "दादोजी कोंडदेव आणि ब्रिगेडचे राजकारण".
तो लेख खूप जणांनी वाचला, काही जणांनी "हरी नरके" हे नांव वाचून, काहींनी "दादोजी" नांव बघून तर काहींनी "ब्रिगेड" नांव बघून...

नरके यांनी त्यांच्या लेखात "ब्राह्मण आणि क्षत्रिय" यांना लक्ष्य करून त्यांच्या "युती" मध्ये कायम "दलित-ओबीसींचा" बळी गेला असे मांडले आहे.
वास्तविक नरके हे बिनग्रेड आणि बामसेफ यांच्या मंचावरचे वक्ते. पण त्यांनीही "जेम्स लेन" चे दळण बिनग्रेडी लोकांनी कसे दळत ठेवले, आपली गिरण बंद न पडू देण्यासाठी, ते स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठीच बिनग्रेडी लोकांनी हे केले असून ते कसे हास्यास्पद आहेत हे हि सांगितले आहे...

असो, तर प्रा. नरकेंनी हे असे सगळे बाहेर का काढले असावे हे ही बघू.
(खालील सर्व मुद्दे हे त्यांच्या लेखातील आहेत.)
१.बिनग्रेडी लोकांनी लेनने उल्लेख केलेल्या १५ भारतीयांना लेनचे हस्तक ठरवले आहे. त्यातील बहुतेक जणांनी "बहुजन-दलित चळवळीला उपकारक" असे काहीतरी योगदान दिले आहे.
त्यामुळे त्यांनाही लेनचे हस्तक ठरविणे ही कृतघ्नता आहे.
२.बिनग्रेडी लोकांनी हे सगळे "फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठी चालू केले आहे.
"ब्रिगेडचा ब्राह्मणद्वेष हा केवळ बुरखा असून फुले आंबेडकरी चळवळीवर अवैध कब्जा मिळवण्यासाठीची ती रणनीती आहे."
अवांतर: म्हणजे फुले-आंबेडकर चळवळीसाठी "ब्राह्मण द्वेष" लागतो, आणि बिनग्रेडी लोकांनी तो "बुरखा" म्हणून "कब्जा" मिळवण्यासाठी घेतलाय असा अर्थ निघू शकतो का?
३. भांडारकरशी संबंध आहे म्हणून बिनग्रेडी लोकांनी नरकेंना राजीनामा द्यायला सांगितले.
४. श्री. पुरके आणि शालिनीताई पाटील यांना ‘"मराठा" विश्वभूषण’ पुरस्कार दिला.
५. बिनग्रेडी लोकांनी दादोजींना "ब्राह्मणांचा आयकॉन" बनवले.
६. सरसकट सर्व ब्राह्मणांना झोडपण्यामागे त्यातील फुले आंबेडकरवादी, परिवर्तनवादी शक्तींचे मित्र असलेल्यांना बहुजनांचे शत्रू म्हणून बदनाम करणे आणि संघ परिवाराच्या काळया बाजूकडून लोकांचे लक्ष या प्रागतिक शक्तींविरुद्ध केंद्रीत करायला लावणे हा डावपेच यामागे आहे.
७. मराठा तितुका मेळवावा! गुणदोषांसहित स्वीकारावा!
दलित भटका ओबीसी! अमराठा अवघा ठेचावा!
सोयरिकी उच्च! आरक्षणी मागास सांगावा!
ब्राह्मणद्वेष दाखवावा! मराठादेश घडवावा!
ब्रिगेडचा हा अंतस्थ कावा.
८. रमाबाई नगर गोळीबार प्रकरणातील आरोपी मनोहर कदम हा स्वजातीय असल्याने शासनाला त्याच्यावर कारवाई करू दिली जात नाही.
९. ओबीसी नेत्यांना मराठाद्वेष्टे ठरवून राजकीय आयुष्यातून उठविण्याचा ब्रिगेडचा कावा असतो.
१०. अमराठाद्वेष हे सूत्र घेऊन, ‘‘जिभ छाटू, हात तोडू, राजकारणातून उखडून टाकू, वाजवा टाळी हाकला माळी, वाजवा तुतारी हाकला वंजारी, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करा’’ अशी मांडणी उघडपणे केली गेली.
११. डॉ. आंबेडकरांच्या रिडल्सवर बंदी घालण्याची मागणी करणारे ब्रिगेडचेच बंधू आहेत.

असो, तर हा लेख एम.डी. रामटेके यांनीही वाचला...
त्यांनी "संभाजी ब्रिगेड एक सम्यक संघट्ना" असा एक लेख आधीच लिहिला आहे.
त्यात बिनग्रेडी लोकांचे भरपूर कौतुक करून "मिडियानी संभाजी ब्रिगेडला बदनाम केले" असेही ते लिहितात.(http://mdramteke.blogspot.com/2010/09/blog-post_14.html)
पण नरकेंच्या लेखानंतर त्यांनी बिनग्रेडी विरोधी लिहिले.
(http://mdramteke.blogspot.com/2011/01/blog-post_29.html)
बिनग्रेडी लोकांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत हे आधीच त्यांच्या लक्षात आले होते आणि नरकेंच्या  लेखातून त्यांना आणखी काही मुद्दे कळले असे ते लेखात लिहितात.
(http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post.html)
त्यांच्याही लेखातील काही मुद्दे:
१. आज चित्र स्पष्ट आहे. मराठा सेवा संघ असो, मराठा महासंघ असो वा संभाजी ब्रिगेड असो. हे सगळे एकाच  माळेचे  मनी आहेत. मराठा हा खेडयापाड्यत दलितांवर अत्याचार करण्यात सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. ओबिसी अन मराठे हे मनुवादयांचे बिनपागारी पोलिस आहेत.
२.बौद्ध समाज सगळ्यात जास्त कुणाकडुन छळल्या जात असेत तर तो मराठा व ओबीसी कडुनच. अशा वेळी Atrocity हा कायदयानी दिलेला बौद्धांचा कवच आहे.
३.हा कयदा आमच्या लाचार अन शोषीत बांधवांचा संरक्षणाचा पिंजरा आहे. ब्रिगेड नावाचा शत्रु आमच्या लोकांचं सोंग घेऊन त्या पिंज-याला तोडु पाहात आहे.

Atrocity चा मुद्दा त्यांना फारच लागला... आणखी एक मुद्दा त्यांना "खटकला", जो नरकेंनी मांडला नाहीये, "जगद्गुरू तुकाराम महाराज", तोही त्यांनी मांडलाय...
४.हिंदुच्या शंकराचार्याला समांतर एक माणुस उभा करायचा म्हणुन तुकारामाला हल्ली जगतगुरुची बिरुदावली लावली जात आहे. निट विचार केल्यावर असं लक्षात आलं की जेंव्हा पासुन बौद्ध बांधवाची ब्रिगेड्शी जवळीक आली तेंव्हा पासुन हे तुकाराम नावाच्या जगतगुरुचा भुत आमच्या लोकांच्या मानगुटीवर बसला.
"जगद्गुरू तुकाराम" हा उल्लेख त्यांना का खटकतो ते त्यांनी "संत तुकाराम जगतगुरु कसे? कोणाचे?" लेखात सविस्तर मांडले आहे. (http://mdramteke.blogspot.com/2011/02/blog-post_1891.html)

वरील मुद्दे हे त्या-त्या लेखकाचे आहेत. मी त्या मुद्यांशी सहमत आहे असे नाही आणि असहमत आहे असेही नाही.
केवळ बिनग्रेडी संघटनेवर त्यांनी का आरोप केले असावेत, त्या संघटनेचे जुने समर्थक असूनही, हे त्यांच्याच मुद्यातून मांडले आहे.
१. बिनग्रेडचा ब्राह्मण-द्वेष जगजाहीर आहे. (ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर)
२. नरकेंना बिनग्रेड मध्ये OBC द्वेष सापडला. (ब्राह्मण, मराठा, OBC आणि दलित)
३. रामटेकेना बौद्ध समाज मराठा आणि obc कडून छळला जातो असे वाटते. बिनग्रेडी लोक त्यांच्या संरक्षणाचा पिंजरा तोडू पाहत आहेत असे त्यांना वाटते. (ब्राह्मण, मराठा, OBC, बौद्ध आणि इतर)

थोडे गट पडले आहेत...
कलीयुगानंतर सत्ययुग येत असले तर वाटचाल कलीयुगाकडेच असते... चालायचंच...

** बाकी रामटेकेचे "अभ्यासपूर्ण" लेखन वाचलेच पाहिजे असे नाही... एकंदरीत सकाळी उठून कोणी तरी धरून त्याच्यावर ताशेरे ओढायचेच असे ठरवून लिहिल्यासारखे वाटते... ते हिंदू नसल्याने हिंदूंचे देव आंदण दिल्यासारखे वापरले आहेत...

No comments:

Post a Comment