Wednesday, April 13, 2011

जाती -जमाती II

"अहो रिक्षावाले" हि अजून एक जमत सगळी कडे सापडते. ("अहो" म्हणा असे explicitly काही रिक्षांच्या मागे लिहिलेलेच असते.) हि जमात बहुसंख्यांक जमातीत मोडते.
ह्यात २ उप-जमाती आहेत. ३ चाकी आणि ६ चाकी वाले. ३ चाकी मधल्या २ उप-उप जमाती नंतर बघू.

६ चाकी वाल्यांना "टमटम" असेही नाव आहे. जाती-जाती अंतर्गत जसे मतभेद असतात तसे याही जमातीत असल्याने आणि थोडे 'अल्पसंख्यांक' गटात असल्याने 'टमटम' वाल्यांना पुणे शहरात बंदी आहे.
जर तुम्ही बाहेरगावातून पुण्यात आलात तर तुमचे स्वागत रिक्षावालेच करतात. तुम्ही तुमच्या बसमधून direct त्यांच्या रीक्षेतच पाय ठेवावेत यासाठी ते न्यायला आलेल्या एखाद्या नातेवाईकापेक्षा अधिक तत्परतेने तुमचे सामान घेत "चला शिवाजी-नगर, ष्टेशन, ष्टेशन " ओरडत असतात. जर तुम्ही "नको, अमकं-तमकं न्यायला येणारे" वगैरे म्हणालात तर अतिशय तुच्छ कटाक्ष टाकून लगेच दुस-या 'गि-हाईकाकडे' वळतात. दुर्दैवाने तुम्हाला रिक्षा करावीच लागली तर "कस्सा सापडला" असे भाव तोंडावर येऊन ५ वाजायला अजून २० मिनिटं आहेत, हे बघत लांबच्या रस्त्याने बरोब्बर ४:५५ ला पोचवतात. दीडपट भाडे वसूल करून आनंदात त्यांची सुरुवात झालेली असते.
मग दिवसभर अश्याच आनंदात लोकांना घुमवत भाडे वसूल करत असतात.
ठिकाण कोणतेही असो, ह्या जमातीच्या लोकांत फार फरक नसतो. अंगात मुरलेला माजोरडेपणा, कसेही-कुठेही भांडायची सवय, कमालीचा निर्लज्जपणा आणि नियम मोडण्याकडे असलेला कल हे गुण असले कि धंदा चांगला चालतो. नाहीतर रिक्षा फार चालत नाही.
"एक न्हावी दुस-या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात" त्याप्रमाणे वाट्टेल तशी रिक्षा फेकताना, नियम मोडताना, "हम सब एक" होऊन एकमेकांची साथ देत असतात. रिक्षावाले कधीही एकमेकांत भांडत नाहीत, traffice rules तोडल्यावरून.
६ चाकी वाले रस्त्यात अचानक थांबणे, आपल्या वाहनाची आसन-क्षमता १५ आहे असे समजून एखादा जास्त या नात्याने माणसे कोंबणे, वाहनाचे suspension BMW किंवा 'हमर' सारखेच आहे असे समजून कितीही मोठ्ठ्या खड्ड्यातून वाट्टेल तशी रिक्षा पळवणे असले प्रकार करत असतात.
३-चाकी रिक्षावाले आपल्या वाहनाला पुढे एकाच चक असले तरी पार्श्वभागी २ चाके आणि त्यानुसार आकार आहे हे विसरून ते वाहन "हाणत" असतात. रस्त्यावर traffic मध्ये "आपल्याला जाता नाही आले तरी बेहत्तर, पण दुस-याला जाऊ द्यायचे नाही" हे ब्रीदवाक्य भूषवतच पुढे सरकत असतात.
या ३ चाकी मधेही उप-उप जमत असते. "मीटर" रिक्षा आणि "शेअर" रिक्षा. पुण्यात शेअर रिक्षावाल्यांना जास्त थारा नाही. आणि शहराबाहेर टमटम असतेच. रत्नागिरीत हे मोठ्याप्रमाणात सापडतात.
"मीटर" वाले हे सामान्यतः "फलाणा-फलाणा" अध्यक्ष असलेल्या बोर्डाखाली तासंतास आपापल्या वाहनात झोपून अथवा गप्पा 'झोडत' असतात. ह्यांचे standard च वेगळे असते. त्या-त्या ठिकाणाच्या नेहमीच्या लोकांकडे (आणि हे लोक ह्या रिक्षावाल्यांकडे) हे ढुंकूनही बघत नाहीत. मुख्यतः शहरातले नवखे लोक हे ह्यांचे लक्ष असते. साधी-साधी ५० गि-हाईके घेण्यापेक्षा मोजकीच पण पैसेवाली गि-हाईके हेरून "बडा" हात मारण्याकडे ह्यांचा कल असतो.
ज्या शहरात शेअर रिक्षा वाले असतात त्यांना हे मीटर वाले "त्यांच्या" एरियात फिरकू देत नाहीत. "मीटर" मागे कुठल्या ना कुठल्या संघटनेचे बळ असते. त्यामुळे गि-हाईक आणि शेअर वाल्यांमध्ये पैसे ठरले तरी मीटर वाले, गि-हाईक आणि शेअर दोघांनाही हुसकून लावतात आणि "गळ" टाकून शांतपणे झोपतात.
हि भांडणे जाती अंतर्गत असतात. गि-हाईकाशी सगळेच तुच्छतेने वागतात. 'शेअर' वाले थोडे नारामाईत असू शकतात. ते दिवसभर कष्ट करत असतात. "सीट" जमवणे हा उद्योग अविरतपणे चालू असतो.
पण हे शेअर वाले कधीही गि-हाईकाला जिकडे जायचे तिकडे वाहन वळवत नाहीत. त्यांचे destination ठरलेले असते. ते आधीच मुळी "ष्टेशन ला येणार का?" असे फिरायला नेणार असल्याच्या थाटात विचारतात.
पुण्यासारख्या शहरात हे शेअर वाले नसल्याने हि कामगिरी मीटर वाले पार पडत असतात. कधीही विचारा, "स्वारगेट?" उत्तर "नाही!"... रिक्षा हे वाहन रस्त्यावर लावल्यास मनपा वाले उचलून नेत नाहीत, त्यात झोपता येते किंवा अड्डा जमवून गप्पा मारता येतात म्हणूनच रस्त्यावर घेऊन यायचे असा त्यांचा कदाचित समज असावा.

३ चाकी रिक्षावाले सगळे 'तिरके' बसतात नाहीतर त्यांना license देत नसावेत.
"तिरके" बसण्यावरून परवाच एक विनोद वाचला. एका रिक्षावाल्याचे लग्न असते. त्यावेळी पाटावर "तिरके" बसून तो वधूला सांगतो, "ताई, थोडं सरकून घ्या कि अजून एक सीट बसेल!!!" ;)

No comments:

Post a Comment