Wednesday, April 6, 2011

जाती-जमाती I

जाती -जमाती म्हटलं कि ज्वलंत चर्चा, मतप्रवाह डोळ्यासमोर येतात... आपण "त्या" जाती-जमाती बाजूला ठेऊ...
त्या जाती-जमातींमध्ये फुट पाडणे, कलह निर्माण करणे, त्यावर राजकारण करणे वगैरे कामे आपली नाहीत... त्याकडे सरकारचे लक्ष आहेच...
त्यात ढवळाढवळ कशाला करा...

वाहतूक विषयांत सुद्धा जाती-जमाती असतात... गाडी चालवताना मीटर-मीटर ला याचा अनुभव येत असतो...
ह्यातलीच एक जमात आपण बघू... कारण हि जमात फक्त 'बघावी', ह्यांच्या 'वाटेला' कुणीही जाऊ नये.

साधारणपणे गाडीच्या दोन्ही बाजूला पाय सोडून traffic मधून वाहन हाकायचा प्रयत्न करणारी व्यक्ती दिसली कि ओळखावे, हि जमात नं. १ आहे.
हि जमात ओळखायला सोपी असते, निदान पुण्यात तरी. अंगावर वयो आणि वस्तुमानानुसार कमी-अधिक कपडे असले तरी तोंड मात्र अफगाणी अतिरेक्यांप्रमाणे गुंडाळून घेतलेले असते.
(पुण्यात बहुतेक बाल्यावस्थेत असतानाच ह्यांना दुपटं गुंडाळतानाच, आई 'हे' फडकं गुंडाळायचे शिकवत असावी)
पंजाबी ड्रेस हे मागासलेपणाचे आणि कुंकू-टिकली हे सांस्कृतिक असभ्यतेचे लक्षण मानणारी हि जमात (बहुतांशी) असल्याने मुलगे आणि ह्यांच्यात भिन्नता दर्शवणारे, तोंडावर फडके आणि दोन्ही बाजूला सोडलेले पाय हे दोन महत्वाचे धागे आहेत.

एक म्हण आहे, "शिंप्याच्या उजव्या हाताला आणि गाढवाच्या मागे" कधी उभं राहू नये." तसेच PMT, रिक्षा आणि ह्या जमातीतील व्यक्तींमागे, पुढे, उजव्या, डाव्या... थोडक्यांत कुठल्याच बाजूला राहू नये.
ते पूर्णतः धोकादायक ठरू शकते, ती व्यक्ती सोडून सगळ्यांना.

रस्त्यावरचा अलिखित नियम आहे. ट्रक आणि (लहान) चारचाकी, चारचाकी आणि दुचाकी, दुचाकी आणि सायकल, सायकल आणि पादचारी... यांच्यामध्ये काही प्रेमळ संवाद घडला तर सगळ्यांची सहानुभूती दुस-यालाच मिळते, चूक कोणाचीही असो-नसो.
आपलीही हि जमात कायम सहानुभूती मिळवणार्यांमध्ये मोडते आणि मग public आपापले विविध कारणांवरचे राग 'दुस-यावर' काढून त्याची पाठ आणि वाहनही मोडते.

कधी ह्या जमातीच्या मागे वाहन चालवण्याचा योग आलाच, तर काही सावधानता बाळगावी लागते. ह्या व्यक्तीने कधी उजव्या बाजूचा signal दिलाच तर ती नक्की डाव्या बाजूलाच वळणार किंवा सरळच जाणार अशा भ्रमात राहू नये. चुकून उजव्याच बाजूला वळण्याचीही शक्यता असते. तेव्हा सावधानतेने परिस्तिथी न हाताळल्यास शेजारच्या public चे मनोरंजनाचे साधन बनू शकता.
साधारणपणे ह्या व्यक्तीने ब्रेक लावल्यासारखे करायला किंवा speed कमी करायला सुरुवात केली कि हि व्यक्ती तीन-चारशे मीटर वर जाऊन कुठेतरी थांबणार असे गृहीत धरायला हरकत नसते...
अश्या वेळी "नियम आहे", म्हणून उजव्या बाजूनेच overtake करायचा धसमुसळेपणा न करता परिस्तिथीचा अंदाज घेऊन गाडी हाकावी लागते. समोरच्या व्यक्तीच्या अचानक ब्रेक लावण्यानेही तुम्ही स्वतःची गाडी पद्धतशीरपणे आडवी करून बसू शकता... फडक्यातून दोन डोळे उगीचच मग "काय साधी गाडी चालवता येत नाही" अश्या अर्थाने लुकलुकतात...

ह्या जमातीत २ उपजमाती आहेत.ह्यातली एक अत्यंत सतर्क आणि दुसरी exactly विरुद्ध असते.
ह्यातल्या सतर्क व्यक्ती ह्या "१०० मीटर" सतर्क असतात. म्हणजे सधारण १००-१५० मीटर पुढे काही घडणार असे "वाटून" ह्या किंकाळी मारून मागील लोकांना सतर्क करतात, आपल्या सतर्कतेने पुढील १००-१५० मीटर वरचा प्रकार टळला असे समजून आनंदात असताना, त्याच सतर्कतेमुळे मागे १०० मीटर वर काही घडले आहे हे ह्यांच्या गावीही नसते.
उलट ह्यांच्या विरुद्धची उपजमात शांत असते. आपल्याच "कूर्म"गतीने नश्वर जगाकडे दुर्लक्ष करत आपापले वाहने "हाकणे" कि क्रिया शांतपणे करत असतात. Helmet घातल्याने आणि १०-१५ च्या गतीने वाहन हाकत असल्याने मागील लोकांचे horn आणि शिव्या ह्यांच्या कर्णेंद्रियापर्यंत पोचून ह्यांची शांतता भंग करू शकत नाहीत...


हि जमात "बघताना" निरुपद्रवी वाटणारी असली तरी वाहतुकीच्या दृष्टीने काही प्रमाणात धोकादायक ठरू शकते...

नीट निरीक्षण करून, ह्यांच्या सवयींचा चांगला अभ्यास आणि सराव केल्यास ह्यांचा त्रास आपल्याला कमी होतो. आपला आपल्या गाडीवरचा control सुधारावा लागतो.
हे सगळे जमले आणि ह्यांच्या आसपास कुठल्याही बाजूला राहता आले तर मात्र प्रवासाचा आनंद आपणही घेऊ शकता.
त्यामुळे काहीही असले तरी हि जमात रस्त्यावर असल्याने आपला प्रवास सुखकर होतो हे मात्र नाकारता येत नाही!!!

1 comment:

  1. Truely awesome dude...

    तुझ्यातला एक चांगला लेखक बाहेर येवू पाहतो आहे. त्याला थाम्बवु नकोस. अशाच प्रतिभेने उजलुन टाक जग सगळ

    ReplyDelete