छोटी
छोटी बाते....
परत स्फोट... बॉम्बशोध पथक..
बघ्यांची गर्दी, सर्कस बघायला आल्यासारखी... परत चर्चा...
जोरदार बंदोबस्त.. मग investigation...पोलीस
राबणार..
समितीची नेमणूक.. त्यात वशिलेबाजी...
त्यावर चर्चा... माननीय
नेते मंडळींची भाषणे...
बडे बडे शहरो मे छोटी
छोटी बाते...
लोकांची मते.. वाचकांचे
पत्र व्यवहार... निषेध आरोप.. प्रत्यारोप...
जाहीर माफी... खलबते..
मुलाखती... आजचे सवाल... SMS...
८१% होय.. १५% नाही...
४% माहित नाही....
investigation सुरूच... जवाबदारी
कोणीतरी घेई पर्यंत...
TV वर लोकांची
रडारड... बड्या नेत्यांची विमानातून/हेलिकॉप्टरमधून/ऐसी गाडीतून भेट...
त्यावर
चर्चा... नकला..
प्रत्युत्तरे...
पलटवार... स्फोटात सापडलेल्या लोकांचे
संसार उभे करण्यासाठी प्रयत्न... सरकारी मदत घोषणा... आधार कार्ड.. बँक
खाते...
"आधार" अनिवार्य?
मिडियातर्फे निषेध...
स्थानिक नगरसेवक, आमदार,
खासदार
यांच्या भेटी...
सोन्याचे शर्ट घालून फोटो... मुलांचे दणक्यात लग्न...
चुकीचे?
बरोबर?..
आजचा
सवाल... संपादकीय लेख...
निषेध मोर्चे...
मेणबत्त्या... श्रद्धांजली.... फेसबुक...
ऐसीत बसून आरामदायी खुर्ची... कीबोर्ड बडवणे...
मी काय करतोय????
मुसलमानच असणार हे...
हैदराबाद ना, बहुसंख्य मुसलमान,
हिंदुत्ववादी
असतील... संघाची मदत... वृत्तपत्रात दखल/बे-दखल.. फोटो...
IM च्या पेज ला लाईक्स... RSS
च्या पेजला पण
लाईक्स...
नाक्यांवर चर्चा..
जेवताना चर्चा... गुलाबजाम, आईस्क्रीम
खाताना चर्चा... फेसबुकवर video sharing... लेखच्या
लेख... मी काय
करतोय?
पोलिसांना शिव्या,
नेत्यांना शिव्या... परप्रांतीय...
स्फोट करणारे घरी एसीत
बसून TV वर सगळं बघून हसत
आहेत...
नेत्यांची भडकाऊ
भाषणे... बस पेटवा... भारत बंद... निषेध...
नेत्यांना अटक... पोलिसांच्या गाडीतून जाताना त्यांचे लोकांना हात हलवून
अभिवादन... हसत हसत.. घोषणा देत...
अजून एक गुन्हा दाखल...
संध्याकाळी सुटका.. press
conference...कदाचित जाहीर माफी...
लोक खुश...
रास्ता रोको...
हार-तुरे.. समारंभ...
क्रिकेट? खेळाडूंना
आमंत्रणे... निषेध... तरीही खेळाचा सामना
सुरक्षित...
खेळाडूंना राजकारणात
अडकवणे... चुकीचे? बरोबर?
दिग्गजांची
मते... परत चर्चा...
शहरांत मुलींना तोंडावर
रुमाल बांधायला बंदी... आमचा हक्क
सोडणार नाही... रुमाल बांधणारच... सुरक्षा गेली तेल लावत..
मुसलमानांना बुरख्यावर
बंदी? नाही... धार्मिक भावना
दुखावायच्या??
फतवे... २ गट...
सापडला... सापडला....
शेख, अब्दुल,
शकील... धागेदोरे..अटक.. जिहादी घोषणा... भारतातूनच अटकेचा
निषेध, मोर्चे... We are
all Abdul, hang us till death....
राष्ट्रीय स्मारक
उध्वस्थ... गोळीबार... पेटवा गाड्या...
अन्याय... अन्याय.. अल्पसंख्यांक... पोलिसांच्याच गाडीवर उभं राहून
पाकिस्तानचा झेंडा...
बडे बडे शहरो मे छोटी
छोटी बाते....
सापडले.... साध्वी
प्रज्ञा... भगवा दहशतवाद... हिंदू
अतिरेकी... मुसलमान गरीब बिच्चारे...
मोर्चे.. माफी...
थंड!!!!
दिल्लीत बलात्कार...
बोअरच्या भोकात प्रिन्स...
घोटाळे...
काही हजार कोटींचे... चाऱ्यापासून विमानापर्यंत... स्वीस बँकेत खाते...
काळा
पैसा... उपोषण... मनधरणी... मोसंबी रस.. उपोषणावरून राजकारण.. आंदोलन...
गांधी टोप्या... लोकांना टोप्या...
स्फोट विरला... आवाज
विरला... लोक विसरले...
समझोता एक्सप्रेस
सुरु... शस्त्रसंधी... काश्मीर...
काश्मिरी पंडितांच्या हत्या सुरूच... अलीगढ university...मतांचे
राजकारण...
सगळे थंड... सगळे
आपापल्या कामांवर... नेत्यांसकट..
आणि
मी तरी काय करतोय????
त्याच जाहीर सभा,
तेच फलक... त्याच घोषणा.. तीच आश्वासने..
तेच आरोप-प्रत्यारोप...त्याच निवडणुका आणि तेच नेते...
तीच कामे.. पैसे..
लाच... तेच प्रश्न.. वाहतूक, पाणी, शेतकरी...
तेच सगळे...
बडे बडे शहरो मे तो छोटी
छोटी बाते होती ही रहती है....
No comments:
Post a Comment