Thursday, July 8, 2010

संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज... - II

समर्थ आणि शिवराय या दोन प्रभूतींच्या भेटीआधीचा प्रसंग...


हात जोडून अत्यंत नम्रपणे शिवाजी राजेंनी तुकाराम महाराजांना विचारले, “महाराज!, रामदास गोसावी काय करतात? त्यांचा पोशाख कसा असतो? ते आपल्यासारखेच गृहस्थ आहेत का?”

तेंव्हा तुकाराम महाराजांनी वर्णन करणारा एक अभंगच शिवाजी महाराजांना लिहून दिला.


हुर्मुजी रंगाचा उंच मोतीदाणा ।
रामदासी बाणा या रंगाचा ॥१॥
पीतवर्ण कांई तेज अघटित ।
अवाळू शोभत भ्रृकुटी माजी ॥२॥
रामनामुद्रा द्वादश हे टिळे ।
पुच्छ ते वळवळे कटीमाजी ॥३॥
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी ।
तुंबा कुबडी करी समर्थांच्या ॥४॥
काष्टाच्या खडावा स्वामींच्या पायांत ।
स्मरणी हातात तुळशीची ॥५॥
कृष्णेच्या तटाकी जाहले दर्शन ।
वंदिले चरण तुका म्हणे ॥६॥


रामदास स्वामीनी शिवाजी राजेंना आपले दोन शिष्य ‘दिवाकर’ आणि ‘कल्याण’ ह्यांच्या हस्ते पत्र पाठवले होते, त्यात ते म्हणतात -


निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ॥
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी॥
परोपकाराचिया राशी । अखंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैची ॥
नरपती हयपती । गजपती गडपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायी ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही ॥
महराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥
कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकास धाक सुटले ।
कित्येकास आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥
तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणू ॥
सर्वज्ञ तुम्ही धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मस्थापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥
उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
संग नसता लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींबरोबरच्या ह्या भेटींनंतर समर्थांना म्हणाले, “स्वामीमहाराज, या सैनिकांना आपण कृपा करुन उपदेशपर काही सांगावे” तेंव्हा समर्थ म्हणतात -


जयास वाटे मरणाचे भये । त्याने क्षात्रधर्म करू नये ।
काहीतरी करोन उपाये । पोट भरावे ॥
मारिता मारिता मरावे । तेणे गतीस पावावे ।
फिरोन येता भोगावे । महद़भाग्य ॥
विन्मुख मरणे नर्के जाती । वाचोन येता मोठी फजिती ।
इहलोक परलोक जाती । पाहा ना का ॥
मरण हाक तो चुकेना । देह वाचिता वाचेना ।
विवेकी होऊन समजाना । काये करावे ।
देव मात्र उच्छेदिला । आपला स्वधर्म बुडाला ।
जित्या परीस मृत्यु भला । ऐसे समजावे ॥
धर्माकरिता मरावे । मरोनी अवघ्यासी मारावे ।
मारता मारता घ्यावे । राज्य आपुले ॥
देवद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावे परत ।
देवदास पावती फत्ते । यदर्थी संशयो नाही ॥
देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्ल्लोळ करावा ।
मुलुख बडवा की बुडवावा । धर्म स्थापनेसाठी ॥


संदर्भ – शिवाजी आणि रामदास, प्रसाद प्रकाशन

8 comments:

  1. हा आपण शोध कधी लावला ?
    रामदासाचे खरे म्हणणे वाचा आणि विचार करा असे बरेच आहेत पण थोडक्यात सांगतो !!!

    छ शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास
    रामदास हा आदिलशहाचा आणि औरंगजेब चा गुप्तहेर होता
    "पायाचा मी दास शाह अर्जी एकवी
    शिवाजीच्या राज्याची धूळधाण व्हावी
    दासाचाही दास आपुल्या मी रामदासी
    दरबार आपुला आदिलशाही
    हीच माझी कसी "

    (ह)रामदास !

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर भाऊ
      ......जसा आजपर्यंत इतिहासाची मोडतोड करून जगभर पसरवला
      त्याच पद्धतीने इथून पुढे देखील भटाळलेल्या औलादी असाच ब्राम्हण प्रतिपालक म्हणवून इतिहास व्हायरस सारखा पसरविणार

      Delete
  2. रामदास म्हणतो :
    अंतर एक तो खरे | परी सांगाते घेऊन येती महारे|
    पंडित आणि चाटी पोरे | एक कैसी ||3||
    मनुष्य आणि गधडे | राजहंस आणि कोंबडे |
    राजे आणि माकडे | एक कैसी ||4||
    भागीरथीचे जल आप | मोरीसंवदानी तो हि आप |
    कश्चीळ उदक अल्प | सेवेवेना ||

    अर्थ : रामदास म्हणतो
    ब्राह्मण म्हणजे विद्वान आणि बहुजन म्हणजे गाढव
    ब्राह्मण म्हणजे राजहंस आणि बहुजन म्हणजे कोंबड्या
    ब्राह्मण म्हणजे राजा आणि बहुजन म्हणजे माकडे
    ब्राह्मण म्हणजे गंगेचे पाणी आणि बहुजन म्हणजे गटाराचे पाणी

    असा नालायक जो बहुजनांना नालायक म्हणतो तो शिवरायांचा गुरु होऊ शकतो काय ? कदापि नाही

    ReplyDelete
  3. रामदास म्हणतो :
    गोरक्ष वाणिज्य कृषी | त्याहून प्रतिष्ठा भिक्षेशी ||
    विसरू नये झोळीशी | कडा काळे ||

    रामदासाने ब्राह्मणांच्या फुकट खाण्याची तरतूद केली , धर्माच्या नावाखाली दुसर्याच्या श्रमावर जगण्याची व्यवस्था करणारा रामदास हा ब्राह्मणांचा आद्य "MANAGEMENT GURU "आहे .

    भिक्षापात्र अवलंबिणे | जळो जिथे लाजिरवाणे ||
    अर्थ : भिक मागून जगता लाज कशी वाटत नाही ?

    ReplyDelete
  4. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    आपले खरे नांव न लिहिणे, ब्राह्मण-द्वेष यावरून आपण बिनग्रेडी (बी-ग्रेडी) आहात हे स्पष्ट होते.
    आपण जे काही श्लोक वगैरे उचलले आहेत, त्याचा स्त्रोत मला चांगलाच माहिती आहे.

    फक्त दोनच कु-शंकांची अत्यंत थोडक्यात उत्तरे देणारे.
    १.
    "छ शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास
    रामदास हा आदिलशहाचा आणि औरंगजेब चा गुप्तहेर होता"
    ==>
    असे असते तर "अफझलखान निघाला आहे" वगैरे शिवाजींना का सांगितले असते?
    शिवाजी राजेंनी आपल्या शत्रूकडे संभाजीराजेंना समर्थांकडे सज्जनगडावर का पाठवले?

    २.
    भिक मागून जगता लाज कशी वाटत नाही ?
    मरूदे, मी नाही सांगणार...
    भिक्षा आणि भीक मधला फरकच माहित नाही तुम्हाला तर काय बाकी काय सांगणार?

    आणि हो, आपली Profile बघितली. "ब्राह्मण (आमच्या भाषेत भट ) हिंदू धर्म आणि भारतातुन फ़ेकले जाओत." या ऐवजी आपण ज्यांना follow करता, त्यांचा धर्म का नाही स्वीकारत, शिवधर्म? त्रासच नाही न तुम्हाला. हिंदू धर्माची काळजी कशाला?
    असो.

    टीप: अजून काही बिनग्रेडी लोक भांडायला वगैरे आलो ब्लॉग वर, तर कोणतेही अपशब्द न वापरता दिलेल्या प्रतिक्रिया ठेवल्या जातील बाकी लगेच उडवल्या जातील.
    प्रतिक्रिया ब्राहमण-द्वेषी असल्या तरी हरकत नाहीत, पण अपशब्द नसावेत.
    कधीतरी ख-या नावाने लिहा हो? :D

    ReplyDelete
    Replies
    1. पायाचा मी दास शाह अर्जी ऐकावी हें कोणी लिहिले ते कृपया स्पष्ट करावे

      Delete
  5. वरील तीन पद्य मुळ रुपात कुठे वाचता येतील?

    ReplyDelete